Pimpri News : समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी कैलास भैरट

एमपीसी न्यूज – समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्षपदी साहित्यिक कैलास भैरट यांची निवड करण्यात आली आहे. चिंचवडगावातील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम येथे शनिवारी (दि.18) झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस उपस्थित होते. 2021 ते 2023 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. कैलास भैरट (अध्यक्ष), सुहास घुमरे (उपाध्यक्ष), मानसी चिटणीस (कार्यवाह), समृद्धी सुर्वे (सहकार्यवाह) यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच, कार्यकारिणी सदस्यपदी उज्ज्वला केळकर, मंगला पाटसकर, जयश्री श्रीखंडे, नीलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, पंजाबराव मोंढे, बाळासाहेब सुबंध, रमेश टेकाडे, विनोद चटप, रामचंद्र प्रधान, राजेंद्र भागवत यांची निवड करण्यात आली असून माजी अध्यक्ष शोभा जोशी यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.