Pimpri News : संघर्षास झुंज देत जीवन जगावे लागते – पद्मश्री गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज : ‘माणसाच्या जीवनात न टाळता (Pimpri News) येणारे अनेक संघर्ष येत असतात, त्याला टाळता येत नाही, ते स्वीकारावे लागतात. त्याच्याशी झुंज देत जीवन जगावे लागते, असे असतानाही इतरांशी संवाद साधावा लागतो’, असे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे तानाजी एकोंडे यांच्या ‘स्वागत’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अशोक महाराज गोरे, नंदकुमार मुरडे, रघुनाथ पाटील, डॉ. पी एस आगरवाल, प्रदीप गांधलीकर,अनिता पांचाळ, अंतरा देशपांडे, तुकाराम पाटील, वर्षा बालगोपाल, आय के शेख, एकनाथ उगले, शोभा जोशी, सविता इंगळे, रमेश वडतकर, जनार्दन गिलबिले, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, नंदकुमार कांबळे, कैलास भैरट, संगीता सल्वाजी, जयश्री गोवंडे, ज्ञानोबा जाधव आदी उपस्थित होते.

प्रभुणे पुढे म्हणाले, ‘एकोंडे यांच्या कार्यक्षेत्राची नाळ कामगारांशी जोडलेली असली, तरी त्यांची कविता मुक्त आहे. तिला विषयाचे बंधन नाही. तिच्यातून आपल्याला जीवनाचा साक्षात्कार होतो. मुक्तछंद, अष्टाक्षरी, शामलाक्षरी, हायकू,काव्यांजली अशा काव्यप्रकारातील त्यांच्या कविता फुलत राहतात.’

डॉ. भारती चव्हाण आपल्या (Pimpri News) अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, ‘स्वतः कवी होणे किंवा लेखक होणे सोपे असते, परंतु आपल्याबरोबर इतरांना मार्गदर्शन करून त्यांनाही आपल्या बरोबर घेऊन जाणे खूप अवघड असते. ते काम कामगार शिक्षक तानाजी एकोंडे आणि शामलाक्षरी काव्यरचनेच्या उद्गात्या शामला पंडित करतात, हे कौतुकास्पद आहे. माता, पिता, गुरु, मातृभूमी आणि अन्नदाता यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून वाचन संस्कृतीचा विकास करणे आता गरजेचे आहे’.

Moshi : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावले मंगळसूत्र

मनोजकुमार सूर्यवंशी, परमेश्वर कुंभार, कल्याणराव मोरे, सुनीता सूर्यवंशी, प्रशांत काळे, उषा काळे, विप्रा दहिभाते, कांता पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

यावेळी उत्तमराव दंडिमे यांनी वेद, पुराणशास्त्र आणि भगवद्गीतेतील संदर्भ देऊन काव्याची महती सांगितली. राधाबाई वाघमारे यांनी स्वागत काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. प्रणाली प्रकाशनाच्या संपादिका शामला पंडित – दीक्षित यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. दिलीप कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.