Moshi : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज – पत्ता विचारण्याच्या (Moshi) बहाण्याने दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावले आहे. हा प्रकार मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथे मंगळवारी (दि.20) सकाळी घडला.

याप्रकऱणी 56 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे महाराष्ट्राच्याही मुख्यमंत्र्यांनी चोख प्रतिउत्तर द्यावे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्याकडे दुचाकीवरून आरोपी आले व त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा (Moshi) केला. फिर्यादी त्यांना पत्ता सांगत असताना त्यांतील एकाने फिर्यादीच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे 80 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.