Pimpri News: महाराणा प्रतापसिंह यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरलेयं – राजेश पाटील

 एमपीसी न्यूज –  शौर्य, पराक्रम  आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले आहे, असे प्रतिपादन महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

 

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. महापालिका भवनामध्ये आयुक्त पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

निगडी चौक येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशहर अभियंता संजय खाबडे, विजयकुमार काळे, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे, उद्यान सहाय्यक नंदकुमार ढवळसकर, मनसे गटनेते सचिन चिखले, पिंपरी चिंचवड राजपूत संघटनेचे पदाधिकारी शिवकुमार बायस, प्रवीण राजपूत, श्रीराम परदेशी जगताप, ललित पवार, जितेंद्र पाटील, अशोक अप्पा, किरण परदेशी, संदिप कवडे  यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, महाराणा प्रताप हे धाडसी व पराक्रमी योद्धे  होते.  त्यांच्या शौर्याच्या कथा नवीन पिढीसाठी स्फूर्तीदायक ठरतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम परदेशी यांनी केले. तर, सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.