Pimpri News : दुध डेअरी व्यावसायिक युवकाने कोरोना योद्ध्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – दुध डेअरी व्यावसायिक स्वप्निल वडगेरी या 28 वर्षीय युवकाने कोरोना योद्धे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले आहे. कोरोना काळात समाजासाठी काम करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना दुध बॉटल व राखी भेट देऊन हा अतूट बंधनाचा सण साजरा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड मधील स्वप्निल वडगेरी हा युवक दुध डेअरी व्यावसायिक आहे. कोरोना काळात पोलीस, डॉक्टर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम केले. त्यामुळे यांना धन्यवाद देण्याच्या दृष्टीकोनातून स्वप्निलने हा उपक्रम हाती घेतला. ‘एमपीसी न्यूज’चे कार्यकारी संपादक ऋषिकेश तपशाळकर यांना सर्वप्रथम राखी बांधलेली दुध बॉटल देऊन उपक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांना राखी बांधलेली दुध बॉटल देऊन धन्यवाद देण्यात आले.

या उपक्रमाबद्दल बोलताना स्वप्निल वडगेरी म्हणाला, ‘रक्षाबंधन हा फक्त भाऊ आणि बहीण यांच्या नात्यांचं महत्त्व सांगणारा सण नाही तर, आपले रक्षण करणाऱ्या रक्षकांना धन्यवाद देण्याचा देखील सण आहे. मी एक व्यावसायिक असून कोरोनाने केलेला विध्वंस जवळून पाहिला आहे. पण, कोरोना विरुद्ध लढाईत फ्रन्ट लाईन कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची रक्षा केली. तसेच, अनेकांनी आपला जीव देखील गमावला.’

‘फ्रन्ट लाईन कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून केलेल्या कामासाठी त्यांना धन्यवाद देण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविला असल्याचे,’ स्वप्निल वडगेरी याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.