Pimpri News: महावितरणने नागरिकांना भेडसावणाऱ्या विद्युत समस्यांचे तत्काळ निराकरण करावे – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विद्युत समस्यांचे महावितरणने तातडीने निराकरण करावे. तसेच दापोडी व बोपखेलसाठी वेगवेगळा स्टाफ असावा. जेणे करून त्या-त्या भागातील समस्यांचे निराकरण तात्काळ होईल अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

आमदार बनसोडे यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत शहरातील नागरिकांच्या विद्युत समस्यांबाबत बैठक घेतली. नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपआपल्या भागातील विविध समस्यांचा पाढाच आमदार बनसोडे यांच्यासमोर वाचला. नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिपरी विभागातील उघड्या डी .पी. बॉक्सची समस्या, पिंपरीमध्ये होणाऱ्या वीज चोरीकडे वेधले. दापोडीच्या नगरसेविका माई काटे यांनी दापोडी परिसरात अंडर ग्राऊंड केबलींग करण्याची मागणी केली. आकुर्डी व दत्तवाडी परिसरामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तातडीने होत नसल्याचे इखलास सय्यद यांनी निदर्शनास आणले. विद्युत समिती सदस्य हिरालाल जाधव यांनी गांधीनगर भागातील खंडीत वीज पुरवठ्याकडे लक्ष वेधले. तसेच दर पंधरा ते वीस दिवसांनी मेन सप्लायची संपूर्ण वायर जळून जात असल्याने त्या नंतर पूर्ण 2 दिवस गांधीनगर अंधारात जाते. हे सातत्याने घडत असल्याचे सांगितले.

नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. पुढील आठवड्यात दापोडी, पिंपरी, गांधीनगर, आकुर्डी, दत्तवाडी, या भागाचा दौरा करून तेथील सर्व डीपी बॉक्स ,विद्युत तारा यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे नियोजले असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप , भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले , निगडी प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता झोडगे , आकुर्डीचे कार्यकारी अभियंता कवडे, चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भोसले मॅडम , चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव, पिंपरीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चाकूरकर , प्राधिकरण सब डिव्हिजनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी , नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका माई काटे , सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे , आशा शिंदे , इखलास सय्यद , गंगा धेंडे , हिरालाल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.