Pimpri News: महापालिका 1 ऑगस्टपासून 4 वॉर्डामध्ये राबविणार घनकचरा व्यवस्थापन

एमपीसी न्यूज – मध्यप्रदेशातील इंदोर शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्वावर चार वॉर्डमध्ये 1 ऑगस्टपासून घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 7 भोसरी, प्रभाग 15 निगडी प्राधिकरण, प्रभाग 28, 29 पिंपळेगुरव, सांगवीमध्ये प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत कार्यशाळा घेऊन आज (बुधवारी) कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य विभाग व शहर परिवर्तन कार्यालयाची जबाबदारी असलेल्या पॅलेडियम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन व कचरा विलगीकरणासंबंधी आयोजित कार्यशाळेचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, प्रभाग क्रमांक 5, 17, 28 आणि 29 मधील सहाय्यक, आरोग्याधिकारी व संबंधित आरोग्य निरिक्षक कर्मचारी उपस्थित होते. तसेच संबंधित प्रभागांचे क्षेत्रीय अधिकारी हे देखील कार्यशाळेकरिता उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या इंदौर महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या  बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेचे प्रतिनिधी  जगताप यांनी कार्यशाळेमध्ये सादरीकरण केले.  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या कचरा विलगीकरणाच्या कार्यवाहीची महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली.  1 ऑगस्ट पासून शहरातील 5,17,28 आणि 29 या प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर या संस्थेमार्फत घनकचरा व्यवस्थापन व कचरा विलगीकरण जनजागृतीचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरामध्ये कचरा विलगीकरणाचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यात येईल. कचरामुक्त शहर व कुंडीविरहित शहर ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.