Pimpri News: ‘सायकल फॉर चेंज’मध्ये पिंपरी-चिंचवड शहाराचा समावेश

एमपीसी न्यूज – नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा हा उद्देश ठेवून केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सायकल फॉर चेंज’ या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सहभागी झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 41 शहरांपैकी 25 शहरांची निवड करण्यात आली आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ भारत स्वस्थ भारत उपक्रमांतर्गत इंडिया सायकल फोर चेंज यामध्ये सहभाग घेतला होता. पिंपरी महापालिका, स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड, सांगवी फाटा, भोसरीतील गावजत्रा मैदान अशा तीन ठिकाणी बीआरटीएस विभागामार्फत सायक्लोथॉनचे आयोजन केले होते.

सायकल रॅलीत 1500 हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. समाजामध्ये हवा, ध्वनी प्रदुषण टाळून इंधन बचतीबरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालविण्याची आवश्यक आहे. सायकलिंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणा-या लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहभागाने सांगवी फाटा-जगताप डेअरी-सांगवी फाटा या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली होती.

बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, ”’सायकल फॉर चेंज’ या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सहभागी झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 41 शहरांपैकी 25 शहरांची निवड करण्यात आली आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे. या स्पर्धेत शहराचा सहभाग झाल्याने शहरातील सायकल चळवळीला बळ मिळण्यास मोठी मदत होणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.