Pimpri News : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली जानेवारी महिन्यात सात टोळी प्रमुखांसह 110 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी जानेवारी 2023 या एका महिन्यात सात टोळी प्रमुखासह 110 जणांवर मोक्का अतंर्गत (Pimpri News)कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात वाढलेल्या संघटीत गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून रोकॉर्डवरील गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्ययावत करत ही कारवाई कऱण्यात आली. यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे सात प्रस्ताव मांडण्यात आले ज्यामध्ये 110 जणांवर कारवाई करण्यात आली.

Mulshi News : युवकांनी श्रमदानाचा ध्यास मनापासून अंगिकारावा –  रोहन जगताप

यामध्ये चिंचवड पोलीस ठाण्याअंतर्गत अनिल तुकाराम महिते  व त्याचे इतर 10 साथीदार, हिंजवडी पोलीस ठाणेय अंतर्गत हिरा बहादुर हमाल इतर सात जण, चाकण पोलीस ठाणे अंतर्गत शुभम सुरेश म्हस्के व इतर 17 जण, निगडी पोलीस ठाणे अंतर्गत दत्ता बाबु संर्यवंशी व इतर तीन, चिंचवड पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या कारवाईमध्ये आकाश राजू काळे व इतर 6 जण, पिंपरी पोलीस ठाणे अंतर्गत विशाल विष्णू लष्करे व इतर 30 जण तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे अंतर्गत कुणाल धिरज ठाकुर इतर 29 जण अशा 110 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

तर निगडी पोलीस ठाणे येथे अक्षय मुकंद गायकवाड याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्धतेची (Pimpri News) कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.