Pimpri News: अभिमानास्पद! वेंगसरकर ॲकॅडमीतील चार खेळाडूंची रणजीसाठी निवड, ऋतुराजकडे कर्णधारपद

एमपीसी न्यूज – देशाअंतर्गत खेळली जाणारी क्रिकेटची सर्वात मोठी रणजी ट्रॉफी स्पर्धा येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सर्व संघातील खेळाडू जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र संघात काळेवाडी येथील वेंगसरकरॲकॅडमीमीतील चार खेळाडूंची संघात निवड झाली आहे.

शहरातील वेंगसरकर अॅकॅडमीतून क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड याच्याकडे महाराष्ट्र संघाची कर्णधार पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. यासह याच अकॅडमीतून प्रशिक्षण घेतलेला क्रिकेटपट्टू पवन शहा, विशाल गिते आणि विकी ओसवाल यांची देखील संघात निवड झाली आहे. शहरातील खेळाडू देशपातळीवर कतृत्व गाजवत असून, पिंपरी चिंचवडसाठी ही अभिमानाची बाब आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे. ‘रणजी ट्रॉपीसाठी वेंगसरकर ॲकॅडमीतून चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडसाठी हा खूप मोठा क्षण आहे,’ असे ट्विट राजेश पाटील यांनी केले आहे.

जानेवारीत होणारी हि स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली, येत्या 17 फेब्रुवारी पासून रणजी क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.