CET Exam : सीईटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परिक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. 31 मार्च ही एमएचटी सीईटी 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र सीईटी 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.mahacet.org वर अर्ज करता येईल. वेबसाईटवर ‘New Registration’ या टॅबवरती क्लिक करून नवीन नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी उमेदवारांकडून 800 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.