Pimpri News : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 2020 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहन नंदकुमार माचरे (वय 26, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित महिलेने शुक्रवारी (दि.28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री करून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवून दमदाटी केली व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.