Pimpri News: ‘कबाड से जुगाड’, लघुफिल्म व गीत स्पर्धेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज –  स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत महापालिकेमार्फत घेतलेल्या कबाड से जुगाड, वेस्ट टु वेल्थ,  लघुफिल्म व गीत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ‘कबाड से जुगाड’ स्पर्धेत घरगुती श्रेणीमध्ये विराज गुपचुप आणि शरद देशपांडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, लघुफिल्म स्पर्धेत अजय पाताडे यांना प्रथम क्रमांक मिळाला.

स्वच्छ महाराष्ट्र/ भारतअभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी-चिंचवड  महापालिका  कार्यक्षेत्रामध्ये  स्वच्छ   सर्वेक्षण  2021  सुरु झाले आहे. या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती,  शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे.

त्याअनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत  कबाड से जुगाड, वेस्ट टु वेल्थ या स्पर्धेमध्ये घरातील खराब झालेल्या वस्तूंपासुन एखादी उपयुक्त वस्तु बनविली असल्यास अशा वस्तुंचे छायाचित्र व माहिती मागविण्यात आली.

औद्योगिक, सामाजिक व घरगुती अशा तीन श्रेणीत ही माहिती  पालिकेच्या स्मार्ट सारथी ॲप व सोशल मिडीयाद्वारे मागविली होती.

उपक्रमाची मांडणी व सादर केलेले कागदपत्र, विस्तृत माहिती, सृजनशीलता, तयार वस्तुंचा  ‍टिकावुपणा, नॉन बायोडिग्रेडेबल/ कमी हानीकारक कच-याचे प्रमाण, पुर्नवापर या निकषांच्या आधारे निकाला जाहीर करण्यात आला.

घरगुती श्रेणीमध्ये विराज गुपचुप आणि  शरद रामचंद्र देशपांडे यांना प्रथम क्रमांक व राघव देशपांडे यांना द्वितीय व व्यावसायिक श्रेणीत चेतन बोरकर यांना प्रथम क्रमांक  देण्यात आला.

याबरोबरच मराठी लघुफिल्म (Short Movie) व गीत (Jingle) स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली होती. घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी मोहिम, कोविड 19 इत्यादी स्वच्छता विषयक बाबींबाबत मराठी लघुफिल्म (Short Movie) व गीत (Jingle) या मधून निकषांच्या आधारे निकाल जाहीर केले आहेत.

मराठी लघुफिल्म स्पर्धेचा निकाल

अजय पाताडे – जनकल्याण प्रतिष्ठान – प्रथम क्रमांक-कचरामुक्त शहर, आकाश प्रदीप थीटे -‌ गॅलॅक्सि मीडिया लॅब्स आणि ऍडिक्टेड थिएटर्स- द्वितीय क्रमांक – न्यु मॉर्निंग, प्रेरणा सेवा- नटरंग फिल्म्स प्रोडक्शन लातूर – तृतीय क्रमांक – स्वच्छ भारत अभियान

गीत(जिंगल) स्पर्धेचा निकाल

रुपाली विनय डावरे – प्रथम क्रमांक-  ओला व सुका कचरा तसेच रोहित सरोज- टाटा मोटर्स कलासागर- यांचे कोविड 19 आणि महापालिका या विषयासाठी व मंदार  खांबेटे- द्वितीय क्रमांक – स्वच्छता, शबाना मुल्ला, नेरुळ- तृतीय क्रमांक – ओला व सुका कचरा.

या सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.