Pimpri News: ‘भाजयुमो’चे संघटन मजबूत करणार – तेजस्विनी कदम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे ( Bhartiy Janta yuva Morcha) संघटन मजबूत करण्यावर आमचा भर आहे. त्यादृष्टीने विविध भागातील युवतींचे एकत्रीकरण करून पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाच्या तेजस्विनी कदम (Tejaswini Kadam )यांनी सांगितले.

शहरातील युवा मोर्चाच्या नियुक्त्या नुकत्याच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील ( Vikrant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कदम यांनी जाहीर केल्या. पक्षाच्या युवा / युवती मोर्चाच्या जिल्हा युवती सह संयोजिका म्हणून सारिका माळी, तर आरती अभिजित यांची युवा मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

या नव्या कार्यकारिणीत अँड. प्रियांका जाधव-काटकर कार्यकारिणी सदस्य, रोहिणी डुंबरे यांची निगडी-चिखली मंडळाच्या चिटणीसपदी, शुभांगी कसबे पिंपरी-दापोडी मंडळ सरचिटणीस, नम्रता अलंकार मंडळ सरचिटणीस, सायली शहाणे प्राधिकरण-चिंचवड मंडळ सरचिटणीस, नम्रता माळी मंडळ चिटणीस, अंकिता वारिएर मंडळ सरचिटणीस, श्रद्धा अस्टेकर-केसकर चिंचवड-किवळे मंडळ चिटणीस, धनश्री जुवेकर भोसरी- च-होली मंडळ चिटणीसपदी नियुक्ती केली असल्याची माहिती तेजस्विनी कदम यांनी दिली.

तसेच शहरातील बहुतेक भागात दांडगा जनसंपर्क ठेऊन सर्वच भागात युवतींचे संघटन मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे युवा मोर्चाच्या माध्यमातून जन सामान्यांपर्यंत पोहचवून कार्य करणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like