Pimpri News: शहरात आज 943 नवीन रुग्णांची नोंद, 820 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यू

सध्या 6101 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 941 आणि हद्दीबाहेरील 2 अशा 943 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 54 हजार 230 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 820 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 14 आणि पालिका हद्दीबाहेरील 10 अशा 24 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये पुनावळे, काळेवाडी, चोविसावाडी, मोशी, चिंचवड, च-होली, वाकड, दिघी, दापोडी, पिंपळेगुरव, खेड, इंदापूर, मावळ, पुरंदर, चाकण, खडकी, अहमदनगर येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 54 हजार 230 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 43 हजार 108 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 923 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 208 अशा 1131 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 6101 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.