Pimpri News: कोरोना लस घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ‘असा’ आहे अनुभव

एमपीसी न्यूज – संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीकरणाला आज सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आठ दवाखान्यात देखील सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीबाबतची नागरिकांची शंका दूर करण्यासाठी भोसरी झोनच्या प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

लसीबाबत शैलजा भावसार म्हणाल्या, सुदैवाने मला कोरोनाची लागण झाली नव्हती. पण, लसीबाबत नागरिकांच्या मनामध्ये शंका-कुशंका आहेत. त्या दूर करण्यासाठी मी स्व:त पहिल्यांदा लस घेतली. सकाळी साडेअकरा वाजता डाव्या हाताच्या दंडावर लस टोचविण्यात आली. त्यानंतर मला अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवले होते.

_MPC_DIR_MPU_II

दोन तासानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. लस टोचविलेल्या ठिकाणी सूज आली नाही. चक्कर, खाज सुटणे असा कोणताही त्रास झाला नाही. आता दुसरी लस 28 दिवसांनी घेतली जाणार आहे. त्यावेळी हीच लस टोचली जाणार आहे.

आमच्या संपूर्ण स्टाफने लस घेतली आहे. आम्हाला लसीचे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. लस घेतल्यानंतर काही त्रास होत आहे का हे पाहण्यासाठी केवळ अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

दरम्यान, भोसरी रुग्णालयातील लसीकरणाला आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक नितीन लांडगे, लक्ष्मण सस्ते, नगरसेविका यशोदा बोईनवाड, रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1