Pimpri News: सोमवारपासून मेट्रोने करा प्रवास! ‘असा’ आहे तिकीट दर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उद्या (रविवारी) सकाळी सव्वा अकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सोमवार (दि.7) पासून नागरिकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. त्यासाठीचे तिकीट दर पुणे मेट्रोने जाहीर केले आहेत.

पुण्यातील वनाज स्थानक ते गरवारे स्थानक आणि पिंपरी-चिंचवड स्थानक ते फुगेवाडी स्थानक या मार्गावर पुणे मेट्रो ट्रेन सेवा सुरु करण्यात येत आहे. सोमवारपासून सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत दिवसभर मेट्रो धावणार आहे. दर 30 मिनिटांनी मेट्रो सुटणार आहे.

पिंपरी-चिंचवड स्थानक ते फुगेवाडी स्थानक दरम्यान ‘असा’ आहे तिकीट दर!

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानकातून मेट्रोत बसल्यास संत तुकारामनगर पर्यंत 10 रुपये, भोसरी (नाशिक फाटा) 10 रुपये, कासारवाडी 20 रुपये, फुगेवाडीपर्यंत 20 रुपये तिकीट दर असणार आहे. तर, संत तुकारामनगर येथील स्थानकातून बसल्यास भोसरी (नाशिक फाटा) पर्यंत 10 रुपये, कासारवाडी 10 रुपये आणि फुगेवाडीपर्यंत 20 रुपये असणार आहे. भोसरी (नाशिक फाटा) येथून बसल्यास महापालिकेपर्यंत 10 रुपये, संत तुकारामनगरपर्यंत 10 रुपये, कासारवाडी 10 रुपये आणि फुगेवाडीपर्यंत 20 रुपये तिकीट दर असणार आहे. कासारवाडी स्थानकातून बसल्यास पिंपरी महापालिकेपर्यंत 20 रुपये, संत तुकारामनगरपर्यंत 10 रुपये आणि फुगेवाडीपर्यंत 10 रुपये तिकीट दर असणार आहे. तर, फुगेवाडी स्थानकातून बसल्यास पिंपरीपर्यंत 20 रुपये, संत तुकारामनगरपर्यंत 20 रुपये, भोसरी (नाशिक फाटा) पर्यंत 10 रुपये आणि कासारवाडीपर्यंत 10 रुपये तिकीट दर असणार आहे.

वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानकापर्यंतचे तिकीट दर!

गरवारे कॉलेज स्थानकात बसल्यास नळ स्टॉप, आयडीयल कॉलनीपर्यंत 10 रुपये आणि आनंदनगर, वनाज स्थानकापर्यंत 20 रुपये, नळ स्टॉप स्थानकातून बसल्यास आयडीयल कॉलनी, आनंदनगर पर्यंत 10 रुपये, वनाजपर्यंत 20 रुपये, आयडीयल कॉलनी स्थानकात बसल्यास गरवारे कॉलेज, नळ स्टॉप, आनंदनगर, वनाजपर्यंत 10 रुपये, आनंदनगर स्थानकात बसल्यास गरवारे कॉलेजपर्यंत 10 रुपये, नळ स्टॉप, आयडीयल कॉलनी, वनाजपर्यंत 10 रुपये तर वनाज स्थानकातून बसल्यास गरवारे कॉलेज, नळ स्टॉपपर्यंत 20 रुपये, आयडीएल कॉलनी, आनंदनगरपर्यंत 10 रुपये तिकीट दर असणार आहे. दोन्ही सेक्शनसाठी दुहेरी प्रवासाचे तिकीट दर 30 रुपये राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.