Pimpri News : शहरातून दोन मुली व एका मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी, चाकण येथून दोन मुली आणि एका मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी, 1 व 3 मार्च या काळात या घटना घडल्या आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 16 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला घरातून कुणीतरी पळून घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी घटना देखील एमआयडीसी भोसरी येथील असून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेडीकमध्ये जाते असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीचे अपहरण केल्याचे फिर्याद नमूद केले आहे.

भाजी आणायला गेलेल्या 15 वर्षीय मुलीचे वाघजाईनगर येथून अपहरण केल्याचे चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे. शुक्रवारी (दि.04) सकाळी 9 वा ही घटना घडली. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी, चाकण येथून दोन मुली आणि एका मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी, 1 व 3 मार्च या काळात या घटना घडल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.