Pimpri News: अन्नधान्यांवरील वाढीव जीएसटीच्या निर्षधार्थ ‘बंद’ला होलसेल विक्रेत्यांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – अन्नधान्य आणि खाद्यान्नांवर (नॉन ब्रँडेड) प्रस्तावित (Pimpri News) पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला पिंपरी-चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. होलसेल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. अन्नधान्यावर जीएसटी आकारण्याच्या निषेधार्थ व्यापा-यांनी आंदोलनात्मक प्रवित्रा घेतला आहे.

कोरोना महानारीनंतर उद्योग व्यवसाय, व्यापार संकाटातून बाहेर येत असताना इंधनाचे, गॅस, सीएनजीचे दर गगनला भिडले आहेत. महागाईचा मोठा भडका उडाला आहे. सामान्य नागरिक महागाईच्या आगीतून होरपळत असताना केंद्र सरकारने ब्रँन्डेड अन्नधान्यांवर यापूर्वीच जीएसटी लावलेला आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली. आता खुल्या अन्नधान्यांवर जीएसटी लावण्याचे प्रस्तावित करणे म्हणजे शेतकरी, सामान्य ग्राहकांवर जिझीयाकार लावण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप करत फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात बंद पुकारला होता.  त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरी, आकुर्डी, निगडी, सांगवीतील होलसेल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला.

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडचे (Pimpri News) अध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, केंद्र सरकारने खाद्यान्नांवर पाच टक्के जीएसटी प्रस्तावित केला आहे. त्याला व्यापा-यांचा विरोध आहे. त्यासाठी पुकारलेल्या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये 80  टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील होलसेलची दुकाने बंद आहेत. केंद्र सरकारने खाद्यान्नांवर प्रस्तावित केलेला जीएसटी रद्द करावा. जीएसटी आणताना केंद्र सरकराने खाद्यान्नांवर जीएसटी लावणार नाही असे सांगितले होते. परंतु, पॅक फुडवर जीएसटी लावला. आता तर खुल्या अन्नाधान्यांवर जीएसटी लावत आहे. कोरोनामुळे महागाई वाढली आहे. अशातच खाद्यान्नांवरील वाढीव जीएसटीमुळे महागाईचा भडका उडणार आहे. प्रस्ताविक अन्याकारक जीएसटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. आकुर्डी, पिंपरी, निगडी, सांगवीतील होलसेल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती.

Chinchwad News: शहराच्या विकासासाठी उद्योगसमूहांनी पुढाकार घ्यावा – आयुक्तांचे आवाहन

पिंपरीतील किराना अॅण्ड ड्रायफुट असोसिएशनचे सचिव सुशील बजाज म्हणाले, ”खाद्यान्नांवर जीएसटी लावला नाही पाहिजे. जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावणे अतिशय चुकीचे आहे. कोरोना महामारीतून लोक बाहेर येत असताना खाद्यान्नांवर पाच टक्के जीएसटी प्रस्तावित केला आहे. खान्याच्या वस्तुंवर जीएसटी कोणालाही मान्य नाही. केंद्र सरकारच्या प्रस्तावित जीएसटीच्या निर्णयाविरोधात आम्ही दुकान बंद ठेऊन निषेध केला आहे. सरकारने जीएसटी लावण्याचा निर्णय मागे घ्यावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.