Pimpri Corona Update: शहरात आज 183 नवीन रुग्णांची नोंद; 238 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 183 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 238 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 65 हजार 252 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 268 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 213 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Chinchwad News: शहराच्या विकासासाठी उद्योगसमूहांनी पुढाकार घ्यावा – आयुक्तांचे आवाहन

तर, 55 रुग्ण महापालिका (Pimpri Corona Update) रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 884 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 79 हजार 882 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.