Pimpri News: शहरातील रुग्णसंख्या 60 हजारांच्या उंबरठ्यावर, आज 1298 नवीन रुग्णांची नोंद

557 जणांना डिस्चार्ज, 19 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 60 हजारांच्या उंबरठ्यावर जावून पोहोचली आहे. शहराच्या विविध भागातील 1219 आणि महापालिका हद्दीबाहेरील 79 अशा 1298 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 59 हजार 966 वर पोहोचली आहे.

शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 557 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 14 आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 19 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी, वाल्हेकरवाडी, भोसरी, रुपीनगर, नेहरूनगर, चिंचवड, निगडी, वाकड, रहाटनी, कासारवाडी, दिघी, आळंदी रोड, खेड, लोणावळा येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 59 हजार 966 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 45 हजार 732 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 980 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 244 अशा 1224 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 6222 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.