Pune News : ‘पीएमपी’च्या अनुकंपा तत्वारील व रोजंदारी सेवकांना कामावर घ्या : दीपाली धुमाळ

व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’ अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी पदावरील सेवकांना कामावर घ्या, अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी ( दि. 10 सप्टेंबर) पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले.

यावेळी माजी नगरसेवक बाबा धुमाळ, पीएमपीएमएल युनियन प्रतिनिधी सुनील नलावडे उपस्थित होते. कोरोनामुळे संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आली होती.

पुणे शहरातही लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

पीएमपीची प्रवासी सेवा बंद असल्याने कर्मचा-यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करुन रोजंदारी सेवकांना कामावर घेतले आहे. परंतु, अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी सेवक आदेशानुसार गेले सहा महिन्यापासून घरी आहेत.

काम नसल्यामुळे त्यांना वेतनही नाही. अनुकंपावरील रोजंदारी सेवकांमध्ये बहुतेक कर्मचारी या महिला आहेत. काम बंद असल्याने कर्मचा-यांना आर्थिक फटका बसला आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

तसेच काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात, मुलांचे शिक्षण व इतर घर खर्चामुळे त्यांना आर्थिक व मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करुन ‘पीएमपी’तील अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी पदावरील सेवकांना कामावर रुजु करुन घेण्यात यावे, अशी विनंतीही राजेंद्र जगताप यांना धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.