Pimpri: अधिकारी, कर्मचा-यांना संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार; 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंवड महापालिकेतील ‘अ’, ‘ब’, ‘क’ संवर्गातील ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी संगणक अर्हता धारण केली नाही. त्यांनी संगणक अर्हता धारण करुन घेऊन 15 फेब्रुवारीपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा, यापुढील पद्दोन्नतीस कालबद्ध पद्दोनतीकरिता अपात्र केल्यास सर्वस्वी जबाबदारी कर्मचा-यांनी राहील. याबाबतचे परिपत्रक प्रशासन विभागाने काढले आहे.

महापालिकेतील गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ संवर्गातील पदांवरील नियुक्तीसाठी संगणक हाताळणे, वापराबाबतचे ज्ञान आवश्यक आणि बंधनकारक ठरविण्यात आले आहे. त्यानुसाकर अधिकारी, कर्मचा-यांनी संगणक हाताळणीबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतनवाढी रोखून धरणे, पदोन्नतीसाठी विचार न करण्याबाबत निर्देश आहेत. वाहनचालकांना प्रमाणपत्र सादर करण्यास सवलत दिली आहे.

महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ अधिकारी, कर्मचा-यांच्या ‘डीओईएसीसी’ सोसायटीच्या अधिकृत ‘सीसीसी’ किंवा ‘ओ’ स्तर, ‘ए’, ‘बी’, ‘सी’ स्तरांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, अथवा महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शित्रण मंडळ यांच्याकडील अधिकृत ‘एमएससीआयटी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे यापैकी एक संगणक ज्ञानाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

अधिकारी, कर्मचा-यांनी अद्यापर्यंत वयाची 50 वर्ष पुर्ण केली नाही. त्यांनी संगणक अर्हता धारण केली नाही. त्यांनी संगणक अर्हता धारण करावी. त्यांनी संगणक अर्हता धारण करुन घेऊन 15 फेब्रुवारीपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा यापुढील पद्दोन्नतीस कालबद्ध पद्दोनतीकरिता अपात्र केल्यास सर्वस्वी जबाबदारी कर्मचा-यांनी राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.