Pimpri: दोन महिन्यात साडेसहाशे अनधिकृत नळजोडांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन महिन्याच्या कालावधीमध्ये 641 अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये ‘ग’ प्रभागातील सर्वाधिक 272 आणि सर्वात कमी ‘अ’ प्रभागातील पाच अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, 2576 नळजोड अधिकृत केले आहेत. दरम्यान, समन्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वार पहिल्या दोन महिन्याकरिता एकदिवसाआड केलेला पाणीपुरवठा यापुढे देखील कायम ठेवला आहे.

दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत वितरण व्यवस्थेत सुसुत्रता आणली जाईल, असे प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ‘अ’ प्रभागातील 5, ‘ब’ 18, ‘क’ 29, ‘ड’ 220, ‘इ’ 0, ‘फ’ 74, ‘ग’ 272, आणि ‘ह’ प्रभागातील 23 अशा 641 अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात आली आहे.

कर, संपूर्ण शहरामध्ये दोन महिन्यामध्ये 2 हजार 576 नळजोड नियमित केले आहेत. त्यामध्ये ‘अ’ प्रभागातील 99, ‘ब’ 178, ‘क’ 113, ‘ड’ 421, ‘इ’ 81, ‘फ’ 166, ‘ग’ 1368 आणि ‘ह’ प्रभागातील 150 नळजोड नियमित करण्यात आले आहेत.

यापुढेही अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अनधिकृत नळकनेक्‍शन घेतले आहे. त्यांनी महापालिकेत अर्ज करून कनेक्‍शन नियमित करून घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.