Pimpri : ओणम म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक- कुम्मनम राजशेखरन

एमपीसी न्यूज – एकात्मता आणि ऐक्याचे प्रतीक म्हणजेच ओणम सण होय. सर्व जाती धर्मातील नागरीकांना एकत्र आल्यास समाजाचा विकास होईल, असे प्रतिपादन मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांनी केले.  नायर सर्व्हिस सोसायटी पिंपरी-चिंचवडच्या वतीने निगडी येथील कृष्णा मंदिरात आयोजित केलेल्या ओणम कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आयोकी ग्रूपचे अध्यक्ष गणेश कुमार, सीरम इंस्टीट्यूटचे संचालक पी.सी नांबियार,श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष हरिदास नायर,टी.पी.सी नायर, नायर सर्व्हिस सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव शशी कुमार,खजिनदार पी. रवींद्रन आदी उपस्थित होते.

दरम्यान, भारत केसरी मन्नत पद्मनाभन यांच्या नावाने दिला जाणारा ‘मन्नम पुरस्कार’ व्ही. जी. नायर यांना प्रदान करण्यात आला. तसेच दहावी/ बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक विश्वनाथन नायर यांनी केले. तर आभार पी. रवींद्रन यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.