Pimpri: कुदळवाडी, बिजलीनगर येथील प्रत्येकी एक महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

Pimpri: One Each woman from Kudalwadi, Bijlinagar reported positive

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडीतील एक आणि चिंचवड, बिजलीनगर येथील एक अशा दोन महिलांचे रिपोर्ट आज  (शुक्रवारी) पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील 254 जणांना कोरोनाची लागण झाली असून 153 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी महापालिकेने कोरोना संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यात कुदळवाडी आणि बिजलीनगर येथील 27, 45 वर्षीय दोन महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, मोशी, पिंपळेगुरव, चिखली, इंदिरानगरमधील 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिका रुग्णालयात 77 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत शहरातील 254 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 153 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात अशा 16 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 17 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like