Pimpri : दृष्टिहिन विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय आणि कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यामध्ये प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय इंग्रजी विभाग व विद्यार्थी विकास मंडळ, रोटरी क्लब ऑफ चिंचवड, इनर व्हिल क्लब ऑफ पिंपरी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीहिन विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय आणि रोजगार संधी ही एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे उदघाटन माजी आमदार अड.राम खांडगे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ऍड. मोहन देशमुख, इनरव्हिल क्लब पिंपरीच्या मनीषा समर्थ, रोटरी क्लब चिंचवड अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, रोट्रॅक्ट क्लब चिंचवडचे अध्यक्ष मयुर कलशेट्टी, सहाय्यक प्रांतपाल विनायक घोरपडे, रो.पल्लवी साबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, रोटरी क्लब चिंचवडचे सचिव बाळकृष्ण खंडागळे, इनरव्हिल पिंपरीच्या सचिव अनिंदिता मुखर्जी, रो. संजय खानोलकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात वाडिया महाविद्यालयाचे डॉ. निरज भगत,ममता अंध अनाथ आश्रमचे तुषार कांबळे, माई बालभवनच्या श्रीमती प्रतिज्ञा देशपांडे, कार्यशाळेच्या प्रथम सत्रात युथ आयकॉन राष्ट्रपती पुरस्कार भूषण तोष्णीवाल यांची मुलाखत डॉ. मंजुषा धुमाळ व डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी घेतले. यामध्ये भूषण यांनी दृष्टीहिन विद्यार्थ्यांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. कार्यशाळे दुस-या सत्रात प्रेरणा असोसिएशनचे सचिव सतीश नवले यांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगार संधी याविषयी मार्गदर्शन केले. रो.शुभदा गोडसे यांनी उद्योजक भवरी कांकरिया यांची मुलाखत घेतली.  कार्यशाळेच्या तिस-या सत्रात उद्योजक भवरी कांकरिया यांनी दृष्टिहिन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गेली अनेक दशके त्यांच्या कंपनीमध्ये दृष्टिहिन विद्यार्थ्यांना रोजगार देत असल्याचे नमुद केले.

समारोप सत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी आणि माजी अध्यक्ष प्रसाद गणपुले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाला चाकाची खुर्ची भेट दिली. या कार्यशाळेसाठी वाडिया महाविद्यालय मॉडर्न महाविद्यालय टिळक विद्यापीठ, मॉडर्न गणेशखिंड, इंद्रायणी महाविद्यालय, एस.पी. महाविद्यालय, माली अंध आश्रममधुन एकूण 72 दृष्टिहिन विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेचे आय़ोजन डॉ. शिल्पागौरी गणपुले, डॉ. मंजुषा धुमाळ, डॉ. आशुतोष ठाकरे, प्रा.नम्रता आल्हाट, प्रा.संतोष वाढवणकर,डॉ. रुपल वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. बी. जी. लोबो, श्री. मुलाणी व श्री . छापरवाल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.