Pimpri: महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान’ स्पर्धेत ओटास्कीममधील रुग्णालय प्रथम

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत (प्रथम लीग) निगडी, ओटास्कीममधील रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला आहे. शाळेमध्ये थेरगावातील माध्यमिक विद्यालय, पिंपळे निलख येथील महापालिका शाळा, गृहनिर्माण संस्थेमध्ये वाकड येथील पलाश को-हौंसिग सोसायटी, स्वच्छ मंडईमध्ये भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईचा प्रथम क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादा द्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे. याकरिता महापालिकेच्या क्षेत्रामधील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था/मोहल्ला मार्केट/मंडई या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे प्रथम लीग (एप्रिल ते जून) आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत हॉस्पीटल्स, शाळा, हॉटेल्स, गृहनिर्माण संस्था/मोहल्ला मार्केट/मंडई यांना या स्पर्धेमध्ये –: प्रथम लिग (एप्रिल ते जुन) सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला आणि सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड इत्यादी निकषांचे आधारे गुणांक देण्यात आले आहे.

या स्वच्छता स्पर्धेमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील संस्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेकरता अर्ज व इतर माहिती हॉटेल्स व रुग्णालया करीता वैदयकिय विभाग, शाळाकरिता शिक्षण मंडळ, व गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये गुणांकनानुसार गुणाक्रमांक काढण्यात आलेला आहे.

निकाल पुढीलप्रमाणे :
यमुनानगर रुग्णालय ओटास्कीम निगडी – प्रथम क्रमांक,
जिजामाता हॉस्पीटल पिंपरी – द्वितीय क्रमांक,
केएसपीएस/तालेरा रुग्णालय चिंचवड गाव – तृतीय क्रमांक.

स्वच्छ हॉटेल:
सयाजी हॉटेल्स लि. वाकड – प्रथम क्रमांक,
मिरॅकल व्हेन्चर ताथवडे – द्वितीय क्रमांक,
म्हस्के लेशर प्रा.लि. एमआयडीसी भोसरी – तृतीय क्रमांक.
हॉटेल शिवाई एमआयडीसी पिंपरी – तृतीय क्रमांक.

स्वच्छ शाळा :- (माध्यमिक विभाग)
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माध्य. विद्यालय थेरगाव – प्रथम क्रमांक
माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव – द्वितीय क्रमांक
राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरुनगर – द्वितीय क्रमांक
क्रीडा प्रबोधनी विद्यालय नेहरुनगर – तृतीय क्रमांक

स्वच्छ शाळा :- (प्राथमिक विभाग)
मनपा शाळा मुले पिंपळे निलख – प्रथम क्रमांक,
मनपा शाळा श्रमिकनगर यांना द्वितीय क्रमांक
मनपा शाळा मोहननगर मुले – तृतीय क्रमांक
मनपा शाळा भुमकर वस्ती वाकड — तृतीय क्रमांक
मनपा शाळा रावेत – तृतीय क्रमांक
मनपा शाळा कस्पटे वस्ती वाकड – तृतीय क्रमांक

स्वच्छ शाळा गृहनिर्माण संस्था :-
पलाश को हौ सोसायटी – वाकड (ड क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक.
ग्लिटराटी अपार्टमेंट – पिंपळे निलख (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
फलोरेन्सीया सहाकारी गृहनिर्माण संस्था वाकड (ड क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक

स्वच्छ मंडई :-
संत ज्ञानेश्वर भाजी मंडई भोसरी – ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय – प्रथम क्रमांक.
बाबुराव शंकरराव तापकीर भाजी मंडई च-होली इ क्षेत्रीय कार्यालय – द्वितीय क्रमांक.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.