Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडून शहरातील सहा भागात रात्रभर औषध फवारणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुरक्षित राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागामार्फत चार दिवस रात्री सोडियम क्लोराइड व बॅक्टोडेक्स ही औषधे फवारण्यात येत आहेत. यातील दुसऱ्या दिवही रविवारी (दि. 29)  पिंपरी, तळवडे, रहाटणी, चिखली, प्राधिकरण आणि भोसरी उपविभागाच्या जवानांनी रात्रभर जागून औषध फवारणी केली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी उपविभागाने वाल्हेकरवाडी, थेरगाव या परिसरात वाहन चालक विकास ढोरे, फायरमन कैलास वाघिरे, अमोल चिपळूणकर, पंकज येडके या जवानांनी दोन वाहनांच्या साहाय्याने रात्री साडेदहा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत औषध फवारणी केली.

तळवडे उपविभागाने तळवडे गाव, तळवडे कमांड, ज्योतिबा नगर, तळवडे गावठाण या परिसरात वाहन चालक भिल्लारे, नामदेव वाघे, गौतम इंगवले, काशिनाथ ठाकरे या जवानांनी रात्री साडेदहा ते पहाटे दोन वाजेपर्यंत औषध फवारणी केली.

रहाटणी उपविभागाने वाकड, काळा खडक, रहाटणी, भूमकर चौक, पिंपळे गुरव या परिसरात सब ऑफिसर अरविंद गुळींग, लीडींग फायरमन गवारे, वाहनचालक अमोल रांजने, फायरमन मनोज मोरे, विलास पाटील या जवानांनी रात्री पावणे दहा ते पहाटे दोन चारपर्यंत औषध फवारणी केली.

चिखली उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या धावडे वस्ती, भोसरी रुग्णालय, भाजी मंडईच्या शेजारील गल्ली, बाबा मंगल कार्यालय या परिसरात रात्री साडेनऊ ते पहाटे सव्वा दोन वाजेपर्यंत लिडिंग फायरमन दिलीप कांबळे, वाहन चालक रुपेश जाधव, फायरमन भरत फाळके, सुनील फरांदे, अनिल माने, बाळासाहेब वैद्य या जवानांनी फवारणी केली.

प्राधिकरण उपविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रावेत, मुकाई चौक, आदर्शनगर, बिजलीनगर , वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरात लिडिंग फायरमन सुभाष लांडे, वाहनचालक शाम खुडे, फायरमन दिनेश इंदलकर, विकास तोरडमल, विठ्ठल सकपाळ, या जवानांनी दोन वाहनांच्या साहाय्याने रात्री पावणे एकरा ते सकाळी सात या कालावधीत फवारणी केली.

भोसरी उपविभागाच्या लिडिंग फायरमन मोहन चव्हाण, वाहनचालक धनंजय गव्हाणे, फायरमन कृष्णा कदम, पुंडलिक भूतापल्ले या जवानांनी रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत गणेशनगर, बोपखेल, मोशी परिसरात फवारणी केली.

सर्व पथकांच्या 28 अधिकारी, कर्मचारी आणि आठ वाहनांनी एकूण 927.5 लिटर सोडियम हायपोक्लोराईड व बॅक्टोडेक्सचे द्रावण 75 हजार लिटर पाण्यातून फवारले आहे. ही मोहीम पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी आपापल्या घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.