Chinchwad News : ट्रान्सफॉर्मर खालील सुकलेल्या कचऱ्याला आग, मोठा अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – ट्रान्सफॉर्मर खाली साठलेल्या सुख्या कचऱ्याने अचानक पेट घेतला. यामुळे विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली आग धुमसू लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कार्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. अमित हौसिंग सोसायटी, चिंचवड येथे (शुक्रवारी, दि.08) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. 

याबाबत अधिकची माहिती अशी की, अमित हौसिंग सोसायटी, चिंचवड येथे महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर सुका कचरा साठलेला आहे. सकाळी अकराच्या सुमारास या कच-याने अचानक पेट घेतला व आग धुमसू लागली.

 

सोसायटीमधील नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन करून याबाबत माहिती दिली. तसेच महावितरण कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. आग विझवून ट्रान्सफॉर्मर खाली साठलेला सुका कचरा बाजूला करण्यात आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.