Pimpri: महापालिका महापारेषणला देणार ‘सुपरव्हीजन चार्जेस’

एमपीसी न्यूज – औंध-रावेत रस्त्यावरील “सब वे’च्या कामात अडथळा ठरणारी महापारेषणची अतिउच्चदाब वीजवाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी येणार आहे. हे काम महापारेषणच्या देखरेखीखाली होणार आहे. त्यासाठी सुमारे साडे अकरा लाख रुपयांचे “सुपरव्हीजन चार्जेस’ महापालिका महापारेषणला मोजणार आहे.

औंध-रावेत रस्त्यावरील पार्क स्ट्रीट सोसायटी येथील “सब वे’च्या बांधकामात अतिउच्चदाब वीजवाहिनी अडथळा करीत आहे. त्यामुळे “सब वे’चे काम थांबले आहे. ही अतिउच्चदाब वीजवाहिनी त्वरित हलविणे अत्यावश्‍यक आहे. वीज वाहिन्या हलविण्यासाठी महापालिकेने कोकण मेलॅबल इंडस्ट्रीज या एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीमार्फत वीजवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी महापारेषणची परवानगी आवश्‍यक असून त्यासाठी “सुपरव्हीजन चार्जेस’ म्हणून जीएसटीसह 11 लाख 48 हजार रुपये महापारेषणला अदा करावे लागणार आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर खोदकामे, विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे सेवा वाहिन्या, अतिउच्चदाब वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महापालिका वर्षाकाठी कोट्यवधी रुपये मोजत आहे. त्यात आता औंध-रावेत रस्त्यावरील अतिउच्चदाब वीजवाहिनीची भर पडली आहे. “सुपरव्हीजन चार्जेस’ म्हणून महापालिका सुमारे साडेलाख रुपये मोजणार असताना वीजवाहिनी स्थलांतरणासाठी वेगळा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.