Pimpri : गरजूंना घरपोच मोफत जेवण देण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड शहरातील संस्थां’चा पुढाकार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मजूर, कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे या काळात हाल होत आहेत. त्यामुळे या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील दोन संस्था महापालिकेच्या माध्यमातून एकत्रित आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून गरजूंना घरपोच मोफत जेवण दिले जाणार आहे.

उदरनिर्वाहाचे साधन नसणाऱ्या गरजू पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग), मजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना घरपोच मोफत भोजन देण्यासाठी जनकल्याण समिती व श्री काळभैरवनाथ उत्सव समिती या स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समन्वयातून कार्यरत आहेत.

चिंचवड (9552578726), भोसरी (8605722777), आकुर्डी (8605422888), पिंपळे सौदागर (7887868555) या भागातील नागरिकांनी संपर्क करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले आहे. घरपोच जेवण देण्याचे अधिकार संबंधित संस्थांना आहेत, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सोमवार (दि. 6) पासून घरपोच मोफत जेवण पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होणार आहे. मोफत भोजन देण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून धान्य अथवा तयार जेवण या संस्था स्वीकारू शकतील. दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी ओंकार गौरीधर (9372937598), शार्दूल पेंढारकर (8805988971) यांच्याशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.