Pimpri :निगडी ते किवळे व चिंचवडगाव ते शिंदे वस्ती रावेत या दोन मार्गावर पीएमपीएमएल बसेस धावणार    

एमपीसी न्यूज –  पीएमपीएमएल तर्फे पिंपरी-चिंचवड शहरात दोन मार्गावर नव्याने दोन बसेस धावणार आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता  निगडी ते किवळे व चिंचवडगाव ते शिंदे वस्ती रावेत या मार्गावर बस नव्याने सुरु करण्यात आल्या आहेत. या मार्गांचे उद्धघाटन मंगळवारी (दि.16) चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते रावेत येथे (Pimpri) करण्यात आले.

Pune : देवेंद्र फडणवीस यांच्या सतर्कतेने वाचले पुण्यातील व्यक्तीचे प्राण; वाचा काय घडलं

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिपक भोंडवे, संतोष भोंडवे,  सोमनाथ भोंडवे, सचिन गावडे, पीएमपीएमएलचे प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. अल्ताफ सय्यद, निगडी डेपो मॅनेजर श्री. शांताराम वाघेरे, बालेवाडी डेपो मॅनेजर  शैलेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती (Pimpri) होती.

विस्तारीत मार्ग पुढील प्रमाणे –

1) मार्ग क्रमांक 307 – चिंचवड गाव ते इस्कॉन मंदिर रावेत चे वेळापत्रक खालीलप्रमाणे

चिंचवड गाव हून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी सव्वा सात , 8 वाजून 25 मी, 9 वाजून 35 मी, 10 वाजून 50 मी,  त्यानंतर दुपारी 12 वाजून 5 मी, सायंकाली चार वाजता, सव्वा पाच वाजता, आणि शेवटी 6 वाजून 35 मी,
इस्कॉन मंदिर रावेत हून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी सात वाजून 50 मी, नऊ वाजता, सव्वा दहा वाजता,साडे अकरा वाजता, दुपारी 12 वाजून 45 मी, 4 वाजून 35 मी. सायंकाळी 5 वाजून 55 मी, 7 वाजून 10 मी.

2) मार्ग क्रमांक 363  – निगडी ते समीर लॉन्स रावेत चे वेळापत्रक खालीलप्रमाणे

निगडी हून बस सुटण्याच्या वेळा – पहाटे 5 वाजून 25 मी, 6 वाजून 10 मी, 6 वाजून 35 मी, 6 वाजून 55 मी, सात वाजून 40 मी,8 वाजून 5 मी, 8 वाजून 25 मी, 9 वाजून 10 मी, 9 वाजून 3588 मी, 9 वाजून 55 मी, 10 वाजून 40 मी, 11 वाजून 5 मी, 11 वाजून 55 मी. दुपारी 12 वाजून 45 मी, 1 वाजून 5 मी, 2 वाजून 10 मी, 2 वाजून 55 मी, 3 वाजून 20 मी, 3 वाजून 40 मी, 4 वाजून 25 मी, 4 वाजून 50 मी, सायंकाळी पुन्हा 5 वाजून 10 मी, 5 वाजून 55 मी, 6 वाजून 20 मी, 6 वाजून 40 मी, 7 वाजून 25 मी, 7 वाजून 50 मी, रात्री 8 वाजून 40 मी,9 वाजून 25 मी,

समीर लॉन्स रावेत हून बस सुटण्याच्या वेळा – सकाळी 6 वाजून 10 मी, 6 वाजून 55 मी, 7 वाजून 20 मी, 7 वाजून 40 मी, 8 वाजून 25 मी, 8 वाजून 50, 9 वाजून 10 मी,9 वाजून 55 मी, 10 वाजून 20 मी, 10 वाजून 40 मी, 11 वाजून 25 मी, 11 वाजून 50 मी, दुपारी 12 वाजून 40 मी, दिड वाजता, 2 वाजून 55 मी, 3 वाजून 40 मी, 4 वाजून 5 मी, 4 वाजून 25 मी, सायंकाळी 5 वाजून 10 मी, 5 वाजून 35 मी, 5 वाजून 55 मी, 6 वाजून 40 मी, 7 वाजून 5 मी, 7 वाजून 25 मी, रात्री 8 वाजून 10 मी, 8 वाजून 35 मी, 9 वाजून 25 मी, 10 वाजून 10 मी.

या वेळेत या बसेस धावणार असून नागरिकांनी या बसेस चा लाभ घेत त्यांची गैरसोय टाळावी (Pimpri) असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.