Pimpri : नेहरूनगर येथील इमारतीत पिंपरी न्यायालयाचे स्थलांतर; जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते नव्या इमारतीचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड न्यायालयाचे ( Pimpri)  मोरवाडी येथून नेहरूनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते बुधवारी (दि. 17) नेहरूनगर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर एस वानखेडे, न्यायाधीश एन आर गजभिये, न्यायाधीश आर एम गिरी, न्यायाधीश एम जी मोरे, न्यायाधीश पी सी फटाले, न्यायाधीश एस पी कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, सह सचिव ॲड.मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड.अक्षय केदार, ॲड. स्वप्नील वाळुंज, ॲड. सौरभ जगताप, ॲड.नितीन पवार, ॲड.प्रशांत बचुटे, ॲड. पवन गायकवाड, सहायक अधिवक्ता साधना बोरकर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील आजी, माजी पदाधिकारी आणि वकील बांधव उपस्थित होते.

Pimpri : नेहरूनगर येथील इमारतीत पिंपरी न्यायालयाचे स्थलांतर; जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते नव्या इमारतीचे लोकार्पण

मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाच प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालये आहेत. मोरवाडी येथील न्यायालयाच्या इमारतीची जागा कामकाजासाठी अपुरी पडत आहे. पार्किंगची प्रशस्त व्यवस्था नसल्याने परिसरात जागा दिसेल तिथे वाहने पार्क केली जातात. मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालयाची भव्य, प्रशस्त इमारत प्रस्तावित आहे. मात्र त्या इमारतीचे काम पूर्ण होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड न्यायालय मोरवाडी येथील महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे

नेहरूनगर येथील इमारतीत एकूण 11 न्यायालयांचे कामकाज लवकरच सुरु होणार आहे. मोरवाडी पिंपरी येथील जुन्या इमारतीमध्ये सेशन कोर्ट व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच मोटर वाहन न्यायालयाची मागणी करण्यात आली आहे. ती मागणी मंजूर होताच त्याही न्यायालयाचे कामकाज मोरवाडी पिंपरी येथील इमारतीतून  सुरु होईल.

नव्या इमारतीतील सुविधा

तळमजला आणि पहिला मजल्यावर प्रत्येकी दोन, दुसऱ्या मजल्यावर सात असे एकूण 11 कोर्ट आहेत. त्यामध्ये न्यायाधीशांचे अँटी चेंबर, स्टेनो रूम, इतर न्यायालयीन कामकाजासाठी कार्यालये आहेत. न्यायाधीशांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, फायर फायटिंग सिस्टीम, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र जिना अशा सर्व सोयींयुक्त नेहरूनगर येथील इमारत आहे. तळमजल्यावर दोन कोर्ट रूम, कॅन्टीन, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तुरुंग व्यवस्था, हिरकणी कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष आहे. पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट रूम, दस्तऐवज कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम, फौजदारी व दिवाणी कागदपत्रांचे कक्ष, सिव्हिल स्ट्रॉंग रूम, सर्व्हर कक्ष, झेरॉक्स रूम, मुद्देमाल कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर सात कोर्ट रूम, कार्यालय, एरिया पीपी रूम, झेरॉक्स रूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.

384 दुचाकी, 69 चारचाकींसाठी पार्किंगची सोय

तळघरात 147 दुचाकी आणि 35 चारचाकी, तळमजल्यावर 150 दुचाकी, पहिल्या मजल्यावर 27 दुचाकी, 26 चारचाकी आणि दुसऱ्या मजल्यावर 60 दुचाकी आणि आठ चारचाकी अशा एकूण 384 दुचाकी व 69 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध आहे.

नव्या इमारतीत 11 न्यायालयांचे कामकाज

सध्या मोरवाडी येथून पाच दिवाणी न्यायालयांचे स्थलांतर होणार आहे. त्यानंतर आणखी सहा न्यायालयांची परवानगी मिळताच त्यांचेही कामकाज सुरु होणार आहे. त्यानंतर नेहरूनगर येथील इमारतीत एक सत्र न्यायालय, दोन उच्चस्तरीय न्यायालये आणि आठ प्रथमवर्ग न्यायदंधिकारी (न्यायालय) यांचे कामकाज होणार ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.