Pune : देवेंद्र फडणवीस यांच्या सतर्कतेने वाचले पुण्यातील व्यक्तीचे प्राण; वाचा काय घडलं

एमपीसी न्यूज- आर्थिक कारणावरून ( Pune) एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तसा मेसेजही त्याने व्हाट्सअप वर टाकला. हाच मेसेज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका व्यक्तीने दाखवला. फडणवीस यांनी हाच मेसेज पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पाठवला आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात या व्यक्तीचा शोध घेत या व्यक्तीचे प्राण वाचवले. त्यानंतर या व्यक्तीचा समुपदेशन करत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. सोमवारी ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्या तरुणाचा इंटिरियर डिझाईनचा व्यवसाय होता. यासाठी लागणारे साहित्य पुरवून तो व्यवसाय करत होता. त्याने ज्या व्यक्तींना साहित्य पुरवले त्यांनी पैसे दिले नाहीत. परिणामी देणेकऱ्यांचा त्याच्या पाठीमागे तगादा लागला. एक कोटीच्या वर उधारी गेल्याने तो चांगलाच तंगीत सापडला होता. त्यात एका व्यक्तीने त्याच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली होती.

MPC News Podcast 17 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

त्यानंतर मात्र या तरुणाचा संयम संपला आणि त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचा एक मेसेज तयार करून त्याने व्हाट्सअप वर देखील पाठवला. या तरुणाच्या एका व्यक्तींपैकी एकाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा मेसेज दाखवला. फडणवीस यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना हा मेसेज कळवला आणि त्यानंतर पोलिसांनीही ऑपरेशन सुरू केले.
गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्या तरुणाच्या घराचा पत्ता शोधला. दत्तवाडी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या सहकार्यांनी त्याच्या अडचणी समजावून घेतल्या. त्याचे समुपदेशन केले. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून समजावून ( Pune) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.