Pimpri : जवानांच्या शौर्यचा राजकीय पक्षांनी स्वार्थासाठी लाभ घेऊ नये – शरद पवार

एमपीसी न्यूज – देशाची कागदपत्रे ज्यांना सांभाळता येत नाहीत आणि म्हणे, माझी छाती 56 इंच, असं म्हणत त्यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. जवान देशासाठी आपले शौर्य दाखवत आहे. राजकीय पक्षांनी स्वार्थासाठी लाभ घेऊ नका, अशी विनंती शरद पवार यांनी भाजप सरकारला केली. जवानांना आधार द्यावा लागतो, विश्वास द्यावा लागतो, हे या सरकारने केले नाही. ही निंदनीय बाब आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

चिंचवड येथील आहेर गार्डन येथे पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्या हस्ते आज चिंचवडमध्ये फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, मावळचे उमेदवार पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

  • यावेळी पवार म्हणाले की, जगातल्या शंभर देशांनी सही केली आहे. त्यात सुध्दा भारताचा सहभाग आहे. जागतल्या सर्व देशांनी दबाव आणला म्हणून पाकिस्तानला अभिनंदन सोडावा लागला. त्याच्या पत्नीने शौर्य दाखविले. ती म्हणाली देशासाठी माझ्या पतीने शौर्य दाखविले, त्याच राजकीय भांडवल करु नका. राफेलच्या एका विमानाची 350 कोटी किंमत होती.

भाजपच्या काळात इमानाची किमीत 560 कोटी रुपये झाली. एक वर्षानंतर 750 कोटी झाली. त्यानंतर फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स कंपनीमध्ये करार झाला. त्यावेळी 1600 कोटी रुपये विमानाची किंमत झाली. त्याची माहिती मागितली तेव्हा ती गुप्त आहे, असं सांगितलं. तीन महिन्यानंतर सुप्रिम कोर्टाने या वादाची कागदपत्रे मागितली त्यावर ते कागदपत्र संरक्षण खात्याच्या कार्यालयातून चोरीला गेल्याचे जाहिर केलं. तीन दिवसांनी हिंदू वर्तमानपत्रात सर्व कागदपत्र छापून आली. परिवर्तन आणण्याची आज गरज आहे. नेहमी माझी छाती 56 इंचाची आहे, असे म्हणणारे नेते धुळे आणि यवतमाळ होते. अशा शब्दांचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी घणाघात केला.

  • राजकीय पक्षांना विशेषता भाजपला विनंती केली, की जवानांच्या शौर्याचा फायदा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी करू नका, असेही पवार म्हणाले. आळंदी आणि देहू परिसरात राहणा-या लोकांच्या योगदानामुळेच देशाच्या लोकसभेत मी एकदा नव्हे, तर तब्बल सातवेळा गेलो. हे योगदान केवळ पार्थ पवार यासाठी नव्हे तर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्यासाठी देखील हवे आहे.
  • शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले, “उद्याच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा येतील आणि आघाडीचे सरकार येईल. दादा तुम्ही घाटाखाली येऊ नका. पार्थ आमचा मुलगा म्हणून काम करू. पूर्ण ताकद त्यांच्या पाठिशी लावू. पार्थची लढाई शेकापची आहे. एक महिना आधी आम्ही कामाला लागलो आहोत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.