Talegaon Dabhade : पार्थ पवार यांची पवना हॉस्पिटलला भेट

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काॅग्रेसचे पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यानी रविवारी पवना हाॅस्पिटला भेट दिली. हाॅस्पिटलचे संस्थापक डाॅ. सत्यजीत वाढोवकर यांची भेट घेऊन हाॅस्पिटल मधील रुग्णांची त्यांनी विचारपुस केली.

यावेळी त्यांच्या समवेत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मु-हे आदी उपस्थित होते. यावेळी केक कापुन पार्थ पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.