Pimpri : जलतरण तलावांचे खाजगीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri) शहरातील 5 जलतरण तलाव सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालविण्यासाठी संस्थांना देणार आहे.

महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे.

Shirgaon : चांदेकरवाडी धरणाजवळ सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराबाहेर जावे लागते. ही सोय शहरात उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने काही तलाव सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे चालविण्यास देण्याचे ठरवले आहे.

सारवाडी, यमुनानगर, पिंपरी वाघेरे, वडमुखवाडी चऱ्होली असे पाच जलतरण तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत. उर्वरीत तलाव महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणार आहेत.

आकुर्डीतील तलावाची खोली मोठी असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे हा जलतरण तलाव कायमचा बंद केला (Pimpri) जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.