Pimpri Rain : पिंपरी चिंचवड परिसरात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस; नागरिकांची धावपळ

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड परिसरात बऱ्याच (Pimpri Rain) ठिकाणी हलका पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण पिंपरी चिंचवड शहरात होते. संध्याकाळी 4.15 वाजेच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी थोड्याथोड्या वेळाने बरसत आहेत.

Pune News : पुण्यात दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण

आता काही दुपारच्या शाळा व क्लास सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची व (Pimpri Rain) पालकांची धावपळ झाली. अनेकांनी झाडे किंवा जवळील बिल्डिंगच्या खाली आसरा घेतला. मुंबई- पुणे हायवेवर अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या झाडाखाली दुचाकी स्वार थांबले होते. तसेच काही दुचाकीस्वार ग्रेड सेपरेटरमध्ये कडेला थांबले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.