Morya Mahotsav : चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी सोहळ्यात अमर ओक यांच्या बासरी वादनाने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – शास्त्रीय संगीतासह, अभंग, भावगीत असे विविध सांगीतिक (Morya Mahotsav) कलाप्रकार सादर करून प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांच्या ‘अमर बन्सी’ या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

निमित्त होते चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व ग्रामस्थांच्या वतीने चिंचवड येथे आयोजित श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी यांच्या 461 व्या संजीवन समाधी महोत्सवाचे. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरालगतच्या देऊळमळाच्या पटांगणावर रविवारी (ता. 11) रात्री हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमापूर्वी पाऊस पडून गेला असूनही शेवटपर्यंत थांबून रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ओक यांनीही त्याबद्दल रसिकांना दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात ओक यांनी रूपक तालातील विलंबित चंद्रकंस रागाने केली. त्यानंतर द्रुत लयीत द्रुत तीन ताल त्यांनी सादर केला. त्यानंतर पहाडी धून सादर केली. त्यांना तबल्यावर पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य आशिष कुलकर्णी यांनी साथसंगत केली. ओक यांची बासरी आणि कुलकर्णी यांच्या तबला वादनाच्या काही काळ चाललेल्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.

त्यानंतर ओक यांनी बासरीवर विविध भक्तिगीते आणि भावगीते सादर केली.

याची सुरुवात ‘तुज मागतो मी आता’, या श्रीमोरया गोसावींचे नातू श्रीधरणीधर (Morya Mahotsav) महाराज देव यांनी रचलेल्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी वारकरी सांप्रदायाला दिलेल्या ‘जय जय रामकृष्ण हरी’, या मंत्राचे ओक यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या मंत्राच्या नादात रसिक तल्लीन झाले होते. त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर ‘सुदर ते ध्यान’ हा अभंग सादर केला. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘मोगरा फुलला’, ‘धनु माझे गुणगुण’, ‘पैल तो गे काहु कोकताहे’, या विराण्या सादर केल्या. या सर्वांमुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. त्यानंतर ‘काळ देहासी आला खाऊ’, हा संत नामदेव महाराज यांचा अभंग सादर करण्यात आला.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व ग्रामस्थांच्या वतीनेश्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६१ व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमर ओक यांचे रविवारी (ता. ११) रंगतदार बासरीवादन झाले.

याच दरम्यान निलेश परब यांची ढोलकी आणि प्रसाद जोशी यांच्या तबलावादनाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे यांनी गायिलेल्या प्रसिद्ध ‘चल ग सखे चल गे सखे पंढरीला’, सुरेश भट यांच्या ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘उदे ग अंबा बाई’, अशी एकाहून एक सरस गीते सादर केली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात निलेश परब यांची ढोलकी आणि प्रल्हाद जोशी यांचा तबला यांची जुगलबंदी चांगलीच रंगली. कार्यक्रमाची सांगता ‘सुखाचे जे सुख’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘ कानडा राजा पंढरीचा’, या अभंगांच्या शृंखलेसह (मिडली) विठ्ठलाच्या नामगजराने झाली.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व ग्रामस्थांच्या वतीने श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६१ व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमर ओक यांचे रविवारी (ता. ११) रंगतदार बासरीवादन झाले. या कार्यक्रमासाठी रसिकांनी केलेली गर्दी

दरम्यान, कार्यक्रमाच्या मध्यात कलाकारांचा शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ओक आणि ढोलकीवादक निलेश परब यांचा सत्कार देवस्थानचे विश्वस्त आनंद तांबे आणि विश्वस्त विनोद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सिंथेसायझर वादक सत्यजित प्रभू यांचा सत्कार गणेश गावडे आणि तांबे यांनी केला. किबोर्ड वादक दर्शन जोग यांचा सत्कार सई देव, तबलावादक प्रसाद जोशी आणि तालवाद्य वादक दत्ताजी तावडे यांचा सत्कार गावडे यांनी केला. साऊंड इंजिनीअर निलेश यादव यांचाही सत्कार करण्यात आला.

Jansanvad Sabha : बेकायदेशीरपणे झाडांची तोडणी होणार नाही याची खबरदारी घ्या; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

मिलिंद कुलकर्णी यांनी अत्यंत माहितीपूर्ण केलेल्या निवेदनाला रसिकांनी चांगली दाद दिली. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात नितीन दैठणकर यांचे पारंपरिक सनई चौघडा वादन झाले. संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ आणि स्थानिक शाळांच्या वतीने अथर्वशीर्ष पठण झाले. अश्विनी चिंचवडे यांच्या सौजन्याने सामूहिक अभिषेक आणि नेत्र, दंत चिकित्सेचा कार्यक्रम झाला. सामाजिक कार्यकर्ते राजू शिवतरे यांच्या सौजन्याने रक्तदान शिबीर झाले.

स्थानिक भजनी मंडळांनी भजन सेवा सादर केली. प्रदीप कोरगावकर यांनी सादर केलेला दशावतारी नाट्य हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. संस्कार भारती समिती – पिंपरी चिंचवडचे इंद्रनील बंकापूरे यांचा ‘मंदिरांच्या देशा’ हा कार्यक्रम झाला. तसेच, दिवसभर सौरयाग व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.