चिखलीतील घरकुल परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – आमदार पै. महेश लांडगे यांच्या (Chikhli Gharkul) लोककल्याण निधीतून आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पाठपुराव्यातून चिखलीतील घरकुल परिसरात रविवारी (दि.11) पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

या कार्यक्रमानुसार घरकुल चिखली येथील D21 अभिनंदन सोसायटी, D2 श्री. गुरुकृपा सोसायटी, D29 स्वराज्य सोसायटी आणि D30 शिवमुद्रा सोसायटी येथे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर धुरी आणि फेडरेशनचे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. आजपर्यंत आमदार महेश लांडगे यांच्या लोककल्याण निधीतून घरकुल चिखली येथे 115 सोसायटीना पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम पार पडले आहे.

Morya Mahotsav : चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी सोहळ्यात अमर ओक यांच्या बासरी वादनाने रसिक मंत्रमुग्ध

या वर्षीच्या टप्प्यामध्ये साधारणपणे 15 नवीन सोसायटीमध्ये (Chikhli Gharkul) पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी दिली. आजपर्यंत आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या कार्याचा आढावा लोकांसमोर मांडण्यात आला. येणाऱ्या काळात सुद्धा आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने चिखली परिसरात लोकाभिमुख कार्य करण्याचा मानस निलेश नेवाळे यांनी बोलून दाखवला.

निलेश नेवाळे यांनी पुढाकार घेत परिसरातील सोसायटींचा परिसर सुशोभीत करुन रहिवाश्यांसाठी चांगले वातावरण निर्माण केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.