Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर मुलाने सहजीवनाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. ही घटना मार्च ते 28 मे 2019 या कालावधीत घडली.

विशाल नवलकिशोर बुंदे (रा. मुंबई सेंट्रल) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि पीडित तरुणी यांच्या घरचे एकमेकांना मागील काही वर्षांपासून ओळखतात. मात्र, या कालावधीत विशाल आणि पीडित तरुणी एकमेकांना ओळखत नव्हते. मागील तीन महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी सहजीवनाच्या आणाभाका घेत सुखी संसाराची स्वप्ने रंगवली.

दरम्यानच्या कालावधीत विशाल याने पीडित तरुणीवर दि रॉयल ऑर्चिड हॉटेल आणि लॉजिंग पिंपरी, हॉटेल न्यू दीपक जे जे हॉस्पिटल जवळ मुंबई आणि हॉटेल अंबर पॅलेस मौलाना आझाद रोड मुंबई या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने विशाल याला लग्नाबाबत विचारले असता विशालने लग्नासाठी नकार दिला.

  • पीडित तरुणीने विशालचे घर गाठले. विशालच्या घरच्यांना लग्नाबाबत विचारले असता घरच्यांनी देखील पीडित तरुणीला शिवीगाळ केली. याबाबत तरुणीने पिंपरी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. महिला पोलीस उपनिरीक्षक उत्कर्ष देशमुख पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.