Pimpri : डिसेंबर अखेर महापालिकेच्या तिजोरीत 333 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यात मालमत्ता करातून 333 कोटी 33 लाख रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागरात जमा झाला आहे. 31 डिसेंबर 2018 अखेर दोन लाख 6 हजार मिळकतधारकांनी कराचा भरणा केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाखाच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे, इडीसी (भीम ऍप) आणि ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे.

पाच लाख मिळकतधारकांपैकी आतापर्यंत एकूण 2 लाख 60 हजार मिळकतधारकांनी 333 कोटी 33 लाख रुपयांचा भरणा केला आहे.  आतापर्यंत या आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 21.73 टक्के भरणा अधिक झाला आहे. मिळकत कराचा अधिक भरणा व्हावा, याकरिता कर संकलन विभागाच्या वतीने नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत योजना राबविली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.