Pimpri: शहरातील खड्डे दोन दिवसात बुजवा; विलास मडिगेरी यांची अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पावसामुळे पडलेले खड्डे तातडीने भरविण्यात यावेत. खड्डे मुक्त रस्ते ‍अभियान राबविण्यात यावे. शहरातील खड्ड्यांचा सर्व्हे करुन दोन दिवसात खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी प्रशासनाला केली आहे.

पावसामुळे शहरात सर्वत्र रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मेट्रो कामकाजामुळे वाहतुकीचा ताण शेजारील सेवा रस्त्यावर येत आहे. पावसामुळे सेवा रस्ते खराब झाले असून खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरीकांना येताना जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ब-याच ठिकाणी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. परिणामी, वाहतुक कोंडी होते.

  • पावसामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच शहरातील बहुतांशी स्पीडब्रेकर जवळ पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला चर नसलेने स्पीड ब्रेकर जवळ पावसाचे पाणी साचते. स्पीड ब्रेकर जवळ पावसाची पाणी वाहून जाण्यासाठी तातडीने वाट करुन द्यावी, अशी मागणी मडिगेरी यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.