Pimpri : रूपीनगर येथे ‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते 125 महिला बचत गटांचे उदघाटन

एमपीसी न्यूज – महिला आर्थिक विकास महामंडळ व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मिशन स्वावलंबन प्रकल्पाअंतर्गत नगरसेवक प्रविण भालेकर आणि माया प्रविण भालेकर यांच्या सहकार्याने नव्याने बांधणी केलेल्या 125 महिला बचत गटांचा उदघाटन समारंभ तसेच महिला-भगिनींना मार्गदर्शन शिबिर रूपीनगर येथे पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते 125 महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ,ज्योतिबानगर,ताम्हाणेवस्ती भागातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे. महिलांना अर्थसाह्य, रोजगार व बाजारपेठ यांची सांगड घालता यावी, स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे, महिलांमध्ये उद्योजकीय विकास घडवून आणणे, या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 12 चे कार्यक्षम नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे , राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर , माजी महापौर मोहिनीताई लांडे, शहराध्यक्ष संजोगजी वाघेरे, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे , नगरसचिव उल्हास जगताप , वरिष्ठ समन्वय अधिकारी अर्चना क्षीरसागर सारस्वत बँकेचे सीईओ वैभव चौधरी तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.