BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पार्थ पवार यांच्या चिंचवड मतदारसंघ दौ-यात सचिन चिखले यांनी घेतली धावती भेट

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस  व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांचा आज, शुक्रवारी चिंचवड मतदारसंघात दौरा होता. या दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी थेरगावमध्ये त्यांची धावती भेट घेतली. दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. 
या दौ-यात प्राधिकरण येथील हनुमान मंदिर उत्सव, पिंपळे गुरव येथे राहुल डंबाळे व संविधान सन्मानार्थ बैठक, थेरगाव येथील ग्राममंदिरात विविध संघटनाची बैठक, नवी सांगवी येथे प्रभाग क्रमांक 29,31,32 येथे घरगुती बैठका झाल्या.
या दरम्यान थेरगाव येथे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पार्थ पवार यांची भेट घेतली व विविध विषयावर दहा मिनिटे चर्चा झाली.
HB_POST_END_FTR-A4

.