Kamshet : विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी 

एमपीसी न्यूज- कामशेत येथील जैन वर्धापन स्थानकवासी संघाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमाने  भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
येथील जैन बांधवांनी  बाजारपेठेतील वर्धमान स्थानक येथे बुधवारी सकाळी जाप आणि प्रार्थना केली. महाराष्ट्र  सौरभ उपप्रवर्तनी महासती श्री सत्यसाधनाजी म.सा. यांचे प्रवचन व मंगलपाठ झाले. यावेळी  ९ महासतीजी  यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी डॉ. सौम्या आकाश टाटीया यांच्याहस्ते ‘जन्मस्वरूप भक्तीरूप’या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
  • ‘स्तन कर्करोग’ या विषयावर स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौम्या टाटीया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गरीब आणि गरजू महिलांना धान्य स्वरूपात शिधा देण्यात आला. सुरेश बेदमुथा यांच्याहस्ते सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ.सौम्या टाटीया यांना आदर्श  कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ.प्रशांत टाटीया, सुरेश बेदमुथा, सुभाष रायसोनी, गिरीष टाटीया, लालचंद चोपडा, विलास  भटेवरा, सुभाष छाजेड, फुलचंद डागळे, वर्धापन स्थानकवासी संघाच्या अध्यक्षा जयश्री बेदमुथा, भारती टाटीया, वंदना डागळे, सुवर्णा रायसोनी, अर्चना टाटीया यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुंढावरे येथील गोशाळेला मान्यवरांच्या हस्ते रोख स्वरूपात मदत देण्यात  आली.
  • प्रस्ताविक सुभाष रायसोनी यांनी केले. स्वागत गिरीष ताटीया यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like