Pimpri : अन्वेषण 2019 मध्ये शुभदा पडवळ हिचे यश

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी शुभदा संतोष पडवळ हिने पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून अन्वेषण 2019 वेस्ट झोन मधील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजि या विषयातील प्रोजेक्टसाठी प्रथम क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली यांच्या वतीने उदयपूर (राजस्थान) येथे विविध पाच गटामध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत 5 राज्यातील 40 विद्यापीठाचे 200 हुन अधिक पदवीधर ते पीएचडी पर्यंतचे स्पर्धक सहभागी झाले होते.

शुभदा पडवळ आणि तिच्या टीमने ‘बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट फ्रॉम ऍग्रीकल्चर वेस्ट’ या प्रोजेक्टचे डिझाइन आणि डेव्हलपमेंट शिक्षिका वर्षा चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. शुभदा पडवळ हिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.