Pimpri: एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल आयोजित ‘लॉकडाऊन’ फोटोग्राफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशभरातून 750 प्रवेशिका, रविवारी जाहीर होणार स्पर्धेतील विजेत्यांची नावे

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज  व देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्या वतीने आयोजित लॉकडाऊन फोटोग्राफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 28 एप्रिलला संपली. या स्पर्धेला खूप मोठा  प्रतिसाद मिळाला असून देशभरातून 750 हून अधिक प्रवेशिका प्राप्त  झाल्या  आहेत. स्पर्धेचा निकाल येत्या रविवारी (तीन मे) ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ या आपल्या लोकप्रिय न्यूज पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. 

पुणे व पिंपरी- चिंचवडमधून तर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहेच,पण या सोबत मावळ, चाकण, बारामती, नगर , ठाणे, नागपूर , मुंबई, सातारा, सांगली, चाकण, सोलापूर, अकलूज, पंढरपूर, मालवण, सिंधुदुर्ग या बरोबरच कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमधूनही स्पर्धेसाठी फोटो पाठवण्यात आले आहेत.

स्पर्धेचा निकाल येत्या रविवारी (तीन मे) एमपीसी न्यूज डॉट इन या आपल्या लोकप्रिय न्यूज पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर समारंभपूर्वक पारितोषिक वितरण करण्यात येईल. कार्यक्रमाची तारीख ही लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या या कालखंडात आपल्या कुटुंबासमवेत असतानाचे विविध क्षण… हा या स्पर्धेचा विषय होता. तसेच ‘घरीच रहा, सुरक्षित  राहा’,  हा संदेश पण समाजात जाण्यासाठीचा केलेला हा यथाशक्ती प्रयत्न होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना एमपीसी न्यूज आणि देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.