Pimpri:  कोरोनामुळे तणावग्रस्त आहात ? चिंता नको, वायसीएममध्ये मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कोरोना  आजार आणि  लॉकडाउनमुळे नैराश्य व गोंधळलेली स्थिती किंवा भीती निर्माण झाली असल्यास ती दूर करणे, मानसिक आधार देण्यासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे.

मानसशास्त्र विभागामार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक, इतर नागरिक यांना कोरोनाबाबत माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन व मानसिक आधार दिला जाणार आहे.  तसेच आनुषंगिक मदत देण्यासाठी  रुग्णालयातील प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यरत वैद्यकीय व मनोसामाजीक समाजसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वैद्यकीय समाजसेवक बोत्रे,  आमले, गायकवाड, ढवळे, सुवर्णकार आणि मनोसामाजीक समाजसेवक जुंकटवार या केंद्राचे कामकाज पाहत आहेत.  रुग्णालय स्थित रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेचे एम. ए. हुसेन देखील विशेष सेवा देण्यास तत्पर आहेत. अधिक माहिती करिता  020-67332297 या संपर्क  क्रमांकावर नागरिक माहिती  घेऊ शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.